गणराजा"च्या दरबारी रक्तदान शिबिर
- by Reporter
- Jan 09, 2024
- 273 views
मुंबई(गुरुदत्त वाकदेकर) : "अभ्युदयनगरचा गणराज" अशी सर्वदूर ख्याती असलेल्या बाल गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि के.ई.एम रुग्णालय यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, दिनांक १४ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गणराज सभागृह, इ.क्र.१६ च्या बाजूला, अभ्युदयनगर, काळाचौकी, मुंबई - ४०००३३ येथे करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर आयोजनाचे मंडळाचे यंदाचे ६ वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या रक्तदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

रिपोर्टर