संध्या आहेर-तांबे यांची रिपब्लिकन सेनेच्या पालघर जिल्हा सचिव पदी नियुक्ती!
संध्या आहेर-तांबे यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश
नवी मुंबई - सरसेनानी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराजजी आंबेडकर यांच्या आदेशाने पालघर जिल्हा अध्यक्ष लवेशजी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख बैठकीमध्ये झालेल्या प्रस्तावामध्ये संध्या आहेर-तांबे यांची सर्वानुमते जाहीर नियुक्ती करण्यात आले.
याप्रसंगी पालघर जिल्हा अध्यक्ष लवेशजी लोखंडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तर पालघर कोषाध्यक्ष मा.सचिनजी पवार पालघर जिल्हा उप चिटणीस मा.शेखर कांबळे,विरार शहर अध्यक्ष मा.विकासजी पवार,विरार शहर उपाध्यक्ष मा.प्रकाश जाधव, संघटक मा.शरद पवार,वसई तालुका अध्यक्ष मा.किशोर गायकवाड, कार्यालयीन सचिव मा.अरुण कदम, विरार शहर युवा सेना अध्यक्ष मा.दिपेश जाधव, विरार शहर युवा सेना उपाध्यक्ष मा.कैलास शिर्के नालासोपारा सदस्य मा.प्रसाद साळवी मा.विलास पवार,मा.बबन कांबळे आदी
मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संध्या आहेर यांचे पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन जाहीर पक्षप्रवेश झाला असे घोषित केले. संध्या आहेर यांचे सर्व उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी संध्या आहेर यांनी आपले विचार मांडले त्या बोलत होत्या आदरणीय, सरसेनानी श्रीमान आनंदराज आंबेडकर यांच्या कार्याला प्रेरित होऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानत्यागाचे ऋण फेडण्यासाठी समाजाचे देणे लागते म्हणून चळवळीमध्ये स्वतःला झोकून देत आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष लवेशजी लोखंडे यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि या पदाला योग्य समजून दिलेल्या जबाबदारी सर्वसामान्यांसाठी तन-मन-धनाने वेळ देऊन सेवा करेल असे त्यांनी विचार या प्रसंगी व्यक्त केले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम