संत रोहिदास जयंती निमित्त भव्य कार्यक्रम नियोजन !

मुंबई : राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई प्रदेशची  महत्त्वाची बैठक नुकत्याच रविवारी मनोहर जोशी महाविद्यालय मैदानात, धारावी येथे संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. या बैठकीला श्री माने यांनी १५ फेब्रुवारी रोजी मनोहर जोशी महाविद्यालय मैदानात, धारावी येथे "संत रोहिदास जयंती निमित्त" भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत घोषणा केली. तसेच समाजातील १० निवडक 'समाज सेवकांना पुरस्कार' देऊन, सत्कार करण्यात येणार आहे, असे सांगितले. या बैठकीला संघाचे मुंबई अध्यक्ष श्री कैलास आगवणे, यांनी सर्व मुंबई पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले. चर्मकार समाजातील सर्व कार्यकर्ते- पदाधिकारी महिला व पुरुष सहपरिवार तसेच तरुणांनी मित्र मंडळी यांनी ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले. या वेळी संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री राम कदम, मुंबई कार्याध्यक्ष श्री विलास गोरेगावकर यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट