विक्रोळी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्यमहोत्सव कार्यक्रमात १८ नाटकाचे सादरीकरण विकेटकिपर ठरले अंतिम विजयी

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित ६८ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात पनवेल केंद्राच्या विकेटकीपर या नाटकाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर वागळे इस्टेट केंद्राचे निस्तेज झाडाच्या फांदीवर हे व्दितीय क्रमांकाने विजयी ठरले  असून टागोरनगर केंद्राच्या काठपदरने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ क्रमांक १- विक्रोळी केंद्राच्या तमाशा आणि उत्तेजनार्थ २- शहाड केंद्राच्या माझं घर या नाटकांनी मिळवला. दिनांक ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, कामगार कल्याण भवन विक्रोळी येथे संपन्न झालेल्या प्राथमिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच  पार पडला.

या पारितोषिक वितरण समारंभाकरीता जेष्ठ नाटककार, लेखक तथा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१८ चे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत विचारे, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडीयाचे अध्यक्ष भालचंद्रसिंग रावराणे व कल्याण आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते.प्राथमिक नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या एकूण १८ नाटकांचे परिक्षण दिप चहांदे, भास्कर पाटील व स्मिता कराळे यांनी केले. 


"मंडळ गेली ६८ वर्षे नाट्यस्पर्धा आयोजित करुन कामगारांना व्यासपिठ उपलब्ध करुन देत असल्याने कामगार लेखक जास्त संख्येने तयार होणे  आणि सामाजिक आशयांची संदेश देणारी नाटके सादर होणे आवश्यक आहे" असे प्रतिपादन प्रेमानंद गज्वी यांनी केले. "कामगार कल्याणचे उपक्रम खुप स्तुत्य असून कामगारांसाठी खुपच उपयोगी असल्याने फेडरेशन मंडळाला मदत करण्यास तयार आहे" असे वक्तव्य भालचंद्रसिंग रावराणे यांनी केले. "व्यावसायिकरित्या यशस्वी झालो असलो तरी अजूनही मी स्पर्धक असल्याचे" प्रशांत विचारे यांनी नमूद केले. "मंडळाच्या योजना, उपक्रम कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा" असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. स्पर्धेचा तपशिलवार निकाल पुढीलप्रमाणे


सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष विभाग : प्रथम क्रमांक – अश्विन जोशी नाटक विकेटकीपर पनवेल केंद्र, व्दितीय क्रमांक - ओंकार तेली नाटक निस्तेज झाडाच्या फांदीवर वागळे इस्टेट केंद्र, तृतीय क्रमांक – प्रभु घोडे नाटक माझं घर शहाड केंद्र, उत्तेजनार्थ क्रमांक  संतोष तुळसकर, -प्रसाद खानोलकर, प्रसाद रावराणे, रोहीत राणे, अनिष राऊळ, -धम्मदिप जाधव, -भरत कोळी, -सिध्देश बागवे, प्रमोद तांबे, -कुणाल शिरोडकर


सर्वोत्कृष्ट अभिनय महिला विभाग – प्रथम क्रमांक - विभूती सावंत नाटक विकेटकिपर पनवेल केंद्र, व्दितीय क्रमांक – सोनाली मगर नाटक काठपदर टागोरनगर केंद्र, तृतीय क्रमांक - ऐश्वर्या शिंदे नाटक द डार्क टिळकनगर केंद्र, उत्तेजनार्थ क्रमांक दर्शना रसाळ, -वरदा पाटील, -केतकी भोईर, -पल्लवी म्हात्रे, -अंजली टाले.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम क्रमांक – दिपेश सावंत नाटक विकेटकिपर पनवेल केंद्र, व्दितीय क्रमांक – राजिव वेंगुर्लेकर नाटक काठपदर टागोरनगर केंद्र, तृतीय क्रमांक – प्रेम कनोजिया नाटक निस्तेज झाडाच्या फांदीवर वागळे इस्टेट केंद्र

सर्वोत्कृष्ट नेपथ्य – प्रथम क्रमांक – स्वरश्री गोडसे नाटक तमाशा विक्रोळी केंद्र, व्दितीय क्रमांक – सचिन गोताड नाटक काठपदर टागोरनगर केंद्र, तृतिय क्रमांक – माणिक शिंदे नाटक माझं घर शहाड केंद्र

सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीत- प्रथम क्रमांक – हितेश क्षीरसागर नाटक डेटिंग विथ रेन वर्तकनगर केंद्र, व्दितीय क्रमांक – प्रथमेश दळवी नाटक विकेटकिपर पनवेल केंद्र, तृतीय क्रमांक – मंदार अशोक पाटील नाटक तमाशा विक्रोळी केंद्र

सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम क्रमांक – शिवाजी शिंदे नाटक विकेटकिपर पनवेल केंद्र, व्दितीय क्रमांक श्याम चव्हाण नाटक काठपदर टागोरनगर केंद्र, तृतीय क्रमांक – साई शिरसेकर  नाटक निस्तेज झाडाच्या फांदीवर वागळे इस्टेट केंद्र.सर्वोत्कृष्ट कामगार नाट्यलेखक वैभव जाधव नाटक द डार्क टिळकनगर केंद्र अशाप्रकारे अनेक मंडळांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कला सादर करून रसिकांच्या मनात जनजागृती घडवण्याचे काम या व्यवसायिक नाटकाद्वारे केले असून ही नाटके पाहण्यासाठी नाट्यप्रेमी व नाट्य रसिक तसेच विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सरनोबत ज्येष्ठ नाटककार जनार्दन लवंगारे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे  मुंबई जिल्हाध्यक्ष व वनिता फाउंडेशनचे संस्थापक  गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय कदम भाजप युवा मोर्चाच्या महिला महामंत्री केतकी ताई सांगळे शिवसेनेचे शंकर ढमाले वंचित आघाडीचे चेतन अहिरे  एडवोकेट प्रांजल जाधव व एडवोकेट निखिल सोनवणे आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नाट्य महोत्सव कार्यक्रमासाठी ठाणे विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सह आयुक्त नितीन पाटील कल्याण निरीक्षक सायली नाईक व मंडळाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आहेर यांनी केले व  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

संबंधित पोस्ट