“वन डे मॅरेज” पुस्तक कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांना दिले भेट
- by Reporter
- Nov 19, 2022
- 524 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या वसतिगृहात गृहपाल या पदावर कार्यरत असलेले दयानंद निवृत्ती लोणे यांचे “वन डे मॅरेज” हे पुस्तक नुकतेच “सकाळ प्रकाशन” तर्फे प्रकाशित करण्यात आले.
यानिमित्त त्यांनी कोकण विभागीय माहिती कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या या पुस्तकाची प्रत कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे तसेच रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, विभागीय माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक प्रवीण डोंगरदिवे यांना म्हणून भेट दिली.
आदिवासी विकास प्रकल्प विभागामध्ये गृहपाल या पदावर कार्यरत असलेले श्री.लोणे यांचा विविध सामाजिक कार्यातही सहभाग असतो.

रिपोर्टर