सावधान! मुंबईत २ नवे कोरोना व्हेरिएंट सापडल्याने खळबळ; ओमिक्रॉन पेक्षा भयंकर एक्सई व्हेरिएंटनचाही समावेश
- by Reporter
- Apr 06, 2022
- 379 views
मुंबई, ०६ एप्रिल : भारतात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट घुसला आहे.काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने ज्या व्हायरस बाबत सावध केलं होतं, त्या एक्सई व्हेरिएंटने भारतात एंट्री घेतली आहे. देशातील पहिला रुग्ण मुंबईतच आढळला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉन पेक्षा १० पट जास्त संसर्गजन्य असल्याचं डब्ब्लूएचओने सांगितलं आहे.
मुंबईतील कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण म्हणजे नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंगच्य़ा अकराव्या चाचणीचे निष्कर्ष जारी करण्यात आले. यात मुंबईत कोरोनाचे दोन नवे व्हेरिएंट सापडल्याचं समोर आलं आहे. यामध्ये एक्सई आणि कप्पा व्हेरिएंट चा समावेश आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
एक्सई हा ओमिक्रॉनचे सबव्हेरिएंट BA.१ आणि BA.२ या प्रकारातून बनलेला आहे. म्हणजे तो recombinant आहे. १९ जानेवारी रोजी सर्वात आधी यूकेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या प्राथमिक अंदाजानुसार एक्सई हा ओमिक्रॉनच्या BA.२ पेक्षा १० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, या दाव्याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

रिपोर्टर