आ. सुनिल राऊत यांच्या आमदार निधीतून कांजुर येथे नागरी कामांचा शुभारंभ
- by Reporter
- Feb 22, 2021
- 990 views
मुलुंड:(शेखर भोसले) आ. सुनिल राऊत यांच्या आमदार फंडातून कांजुरमार्ग येथील साईनगर, रुक्मिणी नगर, अशोक नगर, शिवकृपा नगर, रामनगर, इत्यादी वसाहतीं मधून लादीकरण, ड्रेनेज पाईप लाईन नूतनीकरण, सार्वजनिक शौचालये, इत्यादी नागरी कामे सर्वत्र सुरू करण्यात आली. सोमवार दि २२ फेब्रुवारी रोजी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना बाबा कदम यांनी संबोधित करून विकास कामांची माहिती दिली. स्थानिक शाखाप्रमुख दिपक सावंत, विजय तोडणकर, तानाजी मोरे, संजीवनी तुपे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपोर्टर