दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबचे वाटप
- by Reporter
- Feb 22, 2021
- 597 views
घाटकोपर(निलेश मोरे) बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रचारक मंडळ (रजि.) मुंबई संचालित विक्रोळी विद्यालय माध्यमिक विभाग या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने टॅबचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारी मध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिकवलेल्या भागाचा अधिक सराव होण्यासाठी इयत्ता 10 वी च्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आले. त्याच बरोबर शाळेमध्ये वायफाय जोडून दिलेला आहे. त्यामळे विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मोठे सहकार्य मिळणार आहे. या कार्यक्रमाला कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या अरिजिता मॅडम, त्यांचे सहकारी आणि विकास थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापक भिवा येजरे यांनी कोटक एज्युकेशन फाऊंडेशनचे आभार मानले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे संस्थेचे सचिव गणेश बटा आंणि संस्थेचे अध्यक्ष अजयकुमार चोपडेकर यांचे विशेष सहकार्य व मदतीमुळे आणि कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे मुख्याध्यापकांनी आभार मानताना व्यक्त केले.

रिपोर्टर