घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ आणि सेनाच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार
- by Reporter
- Feb 22, 2021
- 700 views
घाटकोपर(निलेश मोरे)घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ आणि वृत्तपत्र विक्रेता सेनाच्या वतीने या वर्षी लाडशाखीय वाणी समाज मंदिर हॉल , पार्कसाईड विक्रोळी येथे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सांय 5 वा सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे , व्हॉईस ऑफ घाटकोपरचे संपादक जतीन कोठारी , चित्रपट सेनेचे सचिव भूषण चव्हाण , युवा सेनेचे प्रणव दिलीप लांडे आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना काळात विशेष सेवा देणाऱ्या एमबुलन्स व डॉक्टर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष दीपक गवळी , अध्यक्ष नितीन रेणूसे , किशोर येवले , रवी मोरणकर , प्रदीप अमृतकर , संतोष वागचौरे , वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष प्रकाश वाणी , नितीन गंभीर , राकेश , प्रकाश गिलबिले आदींनी विशेष मेहनत घेतली.

रिपोर्टर