सामाजिक कार्यकर्ते रोहित डोंगरे यांचा शिवसेनेत प्रवेश
- by Reporter
- Feb 22, 2021
- 465 views
मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रोहित डोंगरे यांनी मुलुंड पूर्वचे उपविभागप्रमुख महेंद्र वैती आणि शिवसेना शाखा क्र १०६ चे शाखाप्रमुख निलेश मोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रोहित डोंगरे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून व हाती शिवसेनेचा भगवा ध्वज देवून त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १०५ येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी मा. शाखाप्रमुख देसाई, अभिजीत कदम, समीर मालणकर, राजेश देसाई हे उपस्थित होते. मुलुंडमध्ये शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रोहित डोंगरे यांनी यावेळी सांगितले.

रिपोर्टर