८ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृति संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्काराची घोषणा अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव आणि पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,सौ. शकुंतला नगरकर, डॉ. निलेश साबळे,अमितराज यांना 'मृदगंध' पुरस्कार जाहीर
लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पदमश्री अभय बंग, साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रसिद्ध लोककलावंत शकुंतलाबाई नगरकर, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे आणि संगीतकार-गायक अमितराज यांना 'मृदगंध' पुरस्कार जाहीर
- by Adarsh Maharashtra
- Nov 16, 2018
- 1481 views
विक्रम गोखले, अभय बंग, डॉ.नागनाथ कोतापल्ले, शकुंतला नगरकर, निलेश साबळे, अमितराज मानकरी
मुंबई: २६ नोव्हेंबर हा लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा स्मृतिदिन . लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृती संगीत आणि मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे असून ह्या वर्षीच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. विठठल उमप यांचे चिरंजीव गायक नंदेश उमप यांनी पुरस्काराबद्दलची माहिती दिली. यंदाचा लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पदमश्री अभय बंग, साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रसिद्ध लोककलावंत शकुंतलाबाई नगरकर, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे आणि संगीतकार-गायक अमितराज यांना 'मृदगंध' पुरस्कार जाहीर करण्यात आले.
लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे ८ वा स्मृती संगीत समारोह व मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन सोमवार दि.२६ नोव्हेंबर,२०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या समारोहाच्या निमित्ताने संगीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात शिवमणी(तालवादन-फ्युजन) , राहुल देशपांडे(शास्त्रीय गायन), कडूबाई खरात (लोकसंगीत गायन) यांचा सहभाग असणार आहे.
आतापर्यंत ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे, शास्त्रीय नृत्यांगना मंजिरी देव, पत्रकार व लेखक जयंत पवार , अभिनेता सुबोध भावे, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम