चेंबरचे झाकण गायब परंतु पालिकेचे दुर्लक्ष...वाहन चालकांचा व पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
- by Reporter
- Jan 31, 2021
- 939 views
मुलुंड :(शेखर भोसले) नाहुरच्या सुभाष रोडवरील रूणवाल ग्रीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील एका ड्रेनेज चेंबरचे झाकण गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे येथून प्रवास करणारे वाहनचालक, पादचारी व रूणवाल ग्रीन इमारतीतील रहिवाशांना त्यामुळे जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागत आहे. सुदैवाने अद्याप कोणीही या उघड्या चेंबरमध्ये पडले नसल्याने कोणतीही जीवितहानी वा वित्त हानी झाली नाही आहे. परंतु सुसाट येणाऱ्या वाहनांना मात्र धोका पोहचू शकतो तसेच अनवधानाने पादचारी किंवा रहिवासी देखील उघड्या चेंबर मध्ये पडू शकतो.
तेथील रिक्षा स्टँड वरील रिक्षा चालक या उघड्या चेंबर बाबत सातत्याने तक्रार करत असून, याबाबत काही रिक्षा चालकांनी संबधित पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगून चेंबरवर झाकण बसवण्यात सांगितले परंतु पालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. एस वार्डशी संबधित असलेल्या या ड्रेनेज चेंबर बद्दल पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली असून लवकरच झाकण बसवले जाईल असे संबंधितांनी सांगितले.

रिपोर्टर