मुलुंड पूर्व येथे भव्य ग्राहक पेठेचे आयोजन
- by Reporter
- Jan 08, 2021
- 1672 views
मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड पूर्वच्या नगरसेविका रजनी केणी आणि महिला उद्योजिका व बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.७ जानेवारी पासून “भव्य ग्राहक पेठ ब्रँड सेल” मुलुंड खरेदी उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. याचा उदघाटन सोहळा नगरसेविका रजनी केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महिला अध्यक्षा कांचन जयसिंघानिया व युवती प्रमुख वैशाली वैती यावेळी उपस्थित होत्या. या ब्रँड सेल मध्ये गृहोपयोगी व गृहसजावटीच्या वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्रीचे दालन उभारण्यात आले असून स्थानिक नागरिकांना उत्तम खरेदीसाठी, दर्जेदार उत्पादने देणारी, विश्वसनीय, भव्य ग्राहक पेठ यानिमित्ताने मुलुंड मध्ये प्रथमच उपलब्ध झाली असल्याने नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे. या सेलमुळे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात रोजगारापासून वंचित असणा-या महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे.

रिपोर्टर