कुळगांव बदलापुर नगरपालिकेवर राष्ट्रिय रिपब्लिकन पार्टीचा धडक मोर्चा .
- by Rameshwar Gawai
- Dec 04, 2020
- 356 views
बदलापुर(प्रतिनिधी) : कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीत बदलापुर पुर्व आणि पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असुन सदर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या मुळे ऐन पावसाळ्यात बदलापुर मधील नागरिकांना पुराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, शहरातील काही विकासकांनी बदलापुर नगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शहरातील पुर्व आणि पश्चिम परिसरातील जुने नाले बुजवुन त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा सपाटा लावला असुन शहरातील अनेक इमारतींना नियमबाह्य परवानग्या दिल्या असल्याचे लक्षात येत आहे . तर बदलापुर शहरामध्ये आधीच वाहतुक कोंडीची समस्या भेडसावत असताना शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांच्या लागुन शासकिय नियम धाब्यावर बसवून परवानगी देण्यात आली आहे . या मुळे वाहतुक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे . काही इमारतींना तर आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दल किंवा अब्युलंस देखील येण्या जाण्या साठी जागा नाही अशा परिस्थितीत कुठलाही अनर्थ घडू शकतो, बदलापुर नगरपालिका हद्दीत जुगार आणि मटक्याचे धंदे चालवण्यासाठी पुर्व आणि पश्चिम परिसरात अनधिकृत बांधकामे उभी केलेली आहेत. यांना देखील नगरपालिका अधिकारी बेकायदेशीरपणे सहकार्य करत असताना दिसत आहेत ,कुळगाव बदलापुर शहरामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामे आणि इमारतींना परवानगी देणारे नगररचनाकार सदर्शन तोडणकर असुन तोडणकर हे सुमारे तेरा ते चौदा वर्षा पासून बदलापुर नगरपालिकेत सेवेत आहेत . अनधिकृत बांधकामे करणारे हे प्रशासकीय इमारत घोटाळ्यातील आरोपी असुन सदर अधिकारी हा शासनाने बदली केल्यानंतर संबंधित ठिकाणी न जाता पुन्हा पुन्हा बदलापुर नगरपालिके मध्येच येण्याचा हट्ट धरत आपले संबंधित राजकीय वजन वापरून याच पालिकेमध्ये येत असतो कारण बदलापुर शहरातील भ्रष्ट विकासंका शी त्यांची नाळ जोडलेली आहे,नगरपालिकेतील इतर अधिकाऱ्यांवर देखील अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन असे भ्रष्ट अधिकारी बदलापुर नगरपालिकेत नसावेत अशा प्रकारची मुख्य मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची असुन वरिल सर्व अनधिकृत बांधकामांच्या बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी यांना अनेक वेळा निवेदन सादर करुन कारवाईची मागणी केली आहे. परंतु नगरपालिका प्रशासन या बाबत जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येत असुन शहरातील निवेदनात दाखवून दिलेली अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी आणि नगरचना विभागातील भ्रष्ट अधिकारी सुदर्शन तोडणकर यांची तातडीने बदली करावी या मागणीसाठी दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता कुळगाव बदलापुर नगरपालिकेवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रदिप गोविंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे बदलापुर शहर व ग्रामीण अध्यक्ष श्री कैलास जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले असुन सदरचा मोर्चा हा बदलापुर पश्चिम रमेशवाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन सकाळी ११वाजता निघणार असल्याचे श्री कैलास जाधव यांनी सांगितले आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम