मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे चार आरोपी गजाआड .
- by Rameshwar Gawai
- Nov 10, 2020
- 1308 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या वर ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी वॉक करताना तलवारीने प्राणघातक हल्ला झाला होता . तेव्हापासुन या हल्ल्यातील आरोपी हे फरार होते . पण उल्हासनगर क्राईम ब्रॅंच युनिट ४ च्या पोलिसाना या चार ही आरोपींच्या मुसक्या आवळन्यात यश आले असुन या आरोपीना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे .
उल्हासनगर मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार हे ८ ऑक्टोंबर रोजी अंबरनाथ येथे मॉर्निग वॉक करिता गेले होते . तेव्हा गोविंद तिर्थ पुलावर जवळ त्यांच्या वर चार जणानी तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता . तर त्याच्या हाताला तलवारीने वार झाल्याने जबर जखम झाली होती . या हल्ल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर या हल्लेखोराना शोधन्या करिता शोध पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु होता . दरम्यान उल्हासनगर क्राईम ब्रॅंच युनिट ४ चे सहायक पोलिस उप निरीक्षक शाम रसाळ याना गुप्त माहिती गारा कडुन माहीती मिळाली की हे चार ही आरोपी कल्याण येथिल दुर्घाडी किल्ल्याच्या पत्री पुलावर येत आहेत . तेव्हा पोलिसानी त्या ठिकाणी सावळा लावुन चार ही आरोपीना जेरबंद केले . साजिद मोहम्मद अकिल शेख ((१९) अक्षय गिरी (२०) दिपक हरेराम तिवारी (१८) व रोहित इंद्र कांबळे (२१) अशी आरोपीतांची नावे असुन यांच्या कडुन मोबाईल फोन व हल्ल्यात वापरलेली तलवार व मोटर सायकल असा मुद्देमाल पोलिसानी हस्तगत केला आहे.हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला आहे तर यांचे इतर कोणी साथीदार आहेत का हा तपास पोलिस करत आहेत.या आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्याना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवन्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे . सहायक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे . संपत फडोळ . किसन महाशब्दे,शाम रसाळ ,रमजु सौदागर यानी पार पाडली असुन पोलिस आयुक्त विवेक फणसळकर , पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यानी या गुंह्यातील आरोपी अटक केले म्हणुन त्यांचे अभिनंदन केले आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम