जलवाहिनीच्या गळतीमुळे भांडुप परिसरातील पाणीपुरवठा बंद
- by Reporter
- Sep 19, 2020
- 878 views
मुलुंड (शेखर भोसले) : आज १९ सप्टेंबर रोजी 'एस' विभागामध्ये, ऍक्सिस बँक एटीएमच्या समोर, हनुमान हॉटेल जवळ, क्वॉरी रोड, भांडुप (पश्चिम) येथे सकाळी ९:०० वाजता पुन्हा एकदा ९०० मिमी व्यासाच्या जीआरपी जलवाहिनीला अचानक गळती सुरू झाल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने भांडुपमधील काही परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होवू शकले नाही.
यासंदर्भात पालिकेच्या एस वॉर्डमध्ये संपर्क साधला असता, जलवाहिनी दुरूस्तीचे काम सहाय्यक अभियंता जलकामे (बांधकामे) पूर्व उपनगर यांच्यामार्फत सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असून राजा कॉलनी, जोकिम कंपाऊंड, महाराष्ट्र नगर, बौध्द नगर, प्रताप नगर, काजू टेकडी, बीपीईएस स्कुल, मुन्शी महल परिसर,राजा कॉलनी ते प्रताप नगर परिसर, क्वारी रोड, जनता मार्केट, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम) तसेच कांजूर मार्ग (पश्चिम), नेव्हल कॉलनी ते सूर्यनगर, चंदन नगर, गोदरेज हिल कॉलनी, विक्रोळी (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील परिसराला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यावर त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन पाणी जपून वापरावे, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

रिपोर्टर