भाजप च्या ठाणे ग्रामीण उपाध्यक्षपदी काशीनाथ भाकरे*
- by Mahesh dhanke
- Sep 13, 2020
- 901 views
शहापुर / महेश धानकेठाणे जिल्हा ग्रामीण भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकताच करण्यात आल्या असून शहापूर तालुक्यातील भाजप चे निष्ठावंत कार्यकर्ते काशिनाथ भाकरे यांची ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भाकरे यांनी भाजप च्या ठाणे विभागीय सरचिटणीस पदावर १९९० पासुन पक्षाचे काम करत आहे. १९९१ ला भाजपा शाखा अध्यक्ष म्हणून काम केले तर १९९४ ला विभागीय अध्यक्ष पदावर काम केले आहे.२००१ साली भाजप चे शहापूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली. २००४ साली ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पदावर काम करून २००७ मध्ये त्यांना पुन्हा शहापूर तालुक्यात फेरनिवड करून तालुका अध्यक्ष बनविले.०१६ ते २०१९ मध्ये ठाणे पालघर विभागीय सरचिटणीस पदावर बढती देऊन निवड करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष किसन कथोरे यांच्या जिल्हा कार्यकारणी त काशिनाथ भाकरे यांची ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकताच निवड करण्यात आली आहे. भाकरे यांचा दांडगा जनसंपर्क असून दांडगा राजकीय अनुभव आहे. ते जुने भाजप नेते असून शहापूर सह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी पक्षाचे काम केले आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम