अज्ञात व्यक्तीकडू वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या
- by Reporter
- Sep 09, 2020
- 689 views
पालघर (प्रतिनिधी) : वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कादिवली येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात भीती व संभ्रम पसरला आहे. कादिवली येथे राहणारी वृद्ध महिला रखमाई धर्मा गवते (वय ६५) हिला जीवे ठार मारण्याच्या इराद्याने डोक्यात दगडाने वार करून अज्ञात व्यक्ती पसार झाला आहे. रात्री उशिरा ही खबर पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.स. ३०२ व २०१ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करत आहेत.

रिपोर्टर