शहापूर मध्ये कोरोना आटोक्यात येईना ३० व्यक्ती कोरोना बाधित,४ रुग्णाचा मृत्यू

शहापूर(महेश धानके) ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्याला कोरोनाने चांगलेच घेरले असून आज  ३० व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,धक्कादायक बाब म्हणजे आज 4 व्यक्तींना आपला कोरोनात जीव गमवावा लागला आहे.

तालुक्याच्या शहर भागात वाढत असलेली गर्दी आणि गणेशोत्सव मध्ये नागरिकांचा झालेला प्रवास यामुळे अनलॉक ५  मध्ये कोरोना कमी होण्याचे मात्र नाव घेत नाही त्यामुळे  प्रशासनापुढे कोरोनाने  चॅलेंज उभे केले आहे. अवघ्या सहा  दिवसात शहापूर तालुक्यात २९४ रुग्णांची नोंद झाली आहे,म्हणजेच एका आठवड्याच्या आत तालुक्यातून तीन शतक बाधित रुग्ण सापडले आहेत,

तालुक्यातील वाशिंद शहरात तर रोजच रुग्ण वाढत असून तालुक्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून वाशिंद शहराचे नाव पुढे येत आहे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके यांनी दैनिक आदर्श महाराष्ट्रला दिलेल्या आजच्या अहवाला नुसार  तालुक्यातील एकूण बाधित संख्या १७२८ असून आतापर्यंत १२७१ लोकांनी कोरोनावर मात केली आहे,६० रुग्ण मृत्यू पावले असून ३९७ रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत,तर कॉरंटाईन व होम कॉरंटाईन व्यक्तींची संख्या ११०२९आहे,

संबंधित पोस्ट