हिंगोलीत नकली नोटा छपाईचा कारखाना २४ लाखाच्या मुद्देमालासह दोघे अटकेत
- by Reporter
- Sep 03, 2020
- 593 views
हिंगोली (प्रतिनिधी) : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथे भाड्याने घेतलेल्या घरातील एका खोलीत पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी धाड टाकून १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. याप्रकरणी दोन आरोपीं अटकेत असून पोलिसांनी २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आनंद नगर भागातील अरूण हनवते यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास असलेला एक इसम त्याची महिला साथीदार बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणत आहेत, अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी सापळा रचून नमूद ठिकाणी धाड टाकली. यावेळी १००, २००, ५०० आणि २००० रुपये किमतीच्या नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पिवळसर धातुच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती तसेच बनावट १७ लाख ४७ हजार ३५० रुपये, प्रिंटर, चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

रिपोर्टर