आज शहापूर मध्ये कोरोनाचा महापूर,तब्बल ५४ व्यक्ती कोरोना बाधित,
- by Mahesh dhanke
- Sep 02, 2020
- 701 views
शहापूर (महेश धानके) शहापूर तालुक्यात कोरोना बाधित संख्या मागील चार दिवसांपासून वाढत असून आज तर नवा उच्चांक साधत बाधित रुग्णांची संख्या ५४झाली आहे आतापर्यंत चा हा उच्चांक समजला जात असून प्रशासनापुढे कोरोनाने चॅलेंज उभे केले आहे,गणेशोत्सव काळात शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठमध्ये होत असलेली गर्दी पाहून रुग्ण संख्या वाढणार असल्याचे बोलले जात होते ते खरे झाले असून अवघ्या चार दिवसात शहापूर तालुक्यात २२९ रुग्णांची नोंद झाली आहे,तालुक्यातील वाशिंद शहरात तर रोजच रुग्ण वाढत असून तालुक्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून वाशिंद शहराचे नाव पुढे येत आहे
तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके यांनी दैनिक आदर्श महाराष्ट्रला दिलेल्या आजच्या अहवालानुसार तालुक्यातील एकूण बाधित संख्या १६६३असून आतापर्यंत १२४४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे,५५ रुग्ण मृत्यू पावले असून ३७४ रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत,तर कॉरंटाईन व होम कॉरंटाईन व्यक्तींची संख्या १०३३४ आहे,

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम