सणासुदीच्या काळात ‘शेमारू’ संगे आपल्या प्रियजनांना द्या शांती व भक्तीची भेट
- by Reporter
- Aug 27, 2020
- 544 views
मुंबई (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी हा भारतात सर्वत्र अतिशय जल्लोष व उत्साहात साजरा केला जाणारा एक सण आहे. दररोजच्या आरत्यांमध्ये सहभागी होण्यापासून ते मोदकांचा आस्वाद घेण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत या सणाचा आनंद अवर्णनीय असतो. गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडपांना भेटी देऊन आपल्या लाडक्या श्रीगणेशाचे दर्शन घेण्याची ओढ सर्वांनाच लागलेली असते.
यंदाच्या वर्षी मात्र गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे, उत्सवाचा आनंद आपण सर्वजण घेणार आहोत पण घरगुती स्वरूपात. अशावेळी जर तुमच्यासोबत शेमारू स्पीकर्स असतील तर वातावरणातील उत्साहात जराही उणीव जाणवणार नाही. शेमारू भक्ती गणेश भजन वाणी घरी आणून तुम्ही मंडपातील भक्तिमय वातावरण आणि ऊर्जा घरात देखील निर्माण करू शकता. गणेशभक्तांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन विविधांगी भक्तिमय कन्टेन्ट यामध्ये उपलब्ध करवून देण्यात आला आहे. शेमारू भक्ती गणेश भजन वाणीमध्ये तब्बल २२१ भक्तिगीते आहेत, त्यामध्ये भजने, आरत्या, मंत्र, स्तोत्रे व जप यांचा समावेश आहे. भक्ती आणि अध्यात्माशी निगडित तुमच्या सर्व आवडीनिवडी या एकाच स्पीकरमधून पूर्ण होऊ शकतील.
शेमारू भक्ती श्री गणेश भजन वाणी: शेमारू भक्ती श्री गणेश भजन वाणीमध्ये भजने, आरत्या, मंत्र, स्तोत्रे आणि जाप अशा २२१ भक्तिगीतांचा संग्रह आहे. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी असे दोन भाषा पर्याय देखील आहेत.
अतिशय सुबक पद्धतीने डिझाईन केलेला हा ब्ल्यूटूथ स्पीकर एका जागेतून दुसऱ्या जागी सहज नेता येतो, त्याचा आकार गोल, उभट आहे, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ऑक्स केबल देखील असल्याने म्युझिक प्लेअर म्हणून देखील याचा वापर करता येईल. या प्लेअरची बॅटरी पाच तासांपर्यंत चालते आणि आवाजाचा दर्जा उत्कृष्ट आहे. हे स्पीकर्स पाच वॅट क्षमतेचे आहेत. सोनू निगम, अनुप जलोटा, कैलास खेर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि इतर अनेक लोकप्रिय गायकांनी यातील भजने, मंत्र, स्तोत्रे गायली आहेत.
हे स्पीकर्स शेमारू वेबसाईट, तसेच सर्व मोठी ई-कॉमर्स पोर्टल्स आणि भारतात सर्वात मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये तसेच स्थानिक रिटेल आउटलेट्समध्ये खरेदी करता येतील.

रिपोर्टर