भांडुप येथील पालिकेकडून बांधण्यात आलेला कृत्रिम तलाव गणेश विसर्जनापूर्वी फुटल्याने पालिकेच्या प्रतिमेचे भाजप कार्यकर्त्यानी केले तलावात विसर्जन!

मुंबई (जीवन तांबे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबई आणि उपनगरांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. त्यातच भांडुप येथील लालाशेठ कंपाऊंड परिसरात बांधण्यात आलेले कृत्रिम तलाव गणेश विसर्जन आधीच फुटल्यामुळे या तलावांच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असल्याने आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या तलावात जाऊन मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिमेचे तलावात विसर्जन करीत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
 
लाखो रुपये खर्च करून बनविण्यात आलेली ही कृत्रिम तलाव भ्रष्टाचाराचे कुरण असून जर विसर्जनाच्यावेळी ही घटना घडली असती तर जीवित हानी देखील झाली असती त्यामुळे हे तलाव बनविणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली अनुभव नसलेल्यांना कृत्रिम तलाव बांधण्याची कंत्राट देऊन सामान्य नागरिकांचे लाखो रुपये पाण्यात घातल्याचा आरोप करत यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून हे फुटलेल्या कृत्रिम तलावात आंदोलन केले.

संबंधित पोस्ट