एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या पी.व्ही.डी.टी एज्युकेशन महाविद्यालयतर्फे शिक्षकांसाठी राष्ट्रीय पातळीवर वेबिनार संपन्न...

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड-१९ च्या संकटात आणि लॉक डाउनच्या काळात प्रत्येक शिक्षकाला ऑनलाईन शिकविता यावे, विविध सोशल मिडिया चा वापर करता यावा, ह्या उद्देशाने हा राष्ट्रीय पातळीवर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. ह्या वेबिनार मध्ये सुमारे ५५० प्राध्यापक, शिक्षकांनी याचा लाभ घेतला.

ह्या वेबिनारचे प्रास्ताविक भाषण प्रा.डॉ. गजानन गुल्हाने, शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ह्यांनी केले.

ह्या वेबिनारसाठी प्रा.डॉ.दीपा बिस्त, प्रा.डॉ. पूनम कक्क्ड आणि प्रा.डॉ. जितेंद्र बागूल हे मार्गदर्शक वक्ते लाभले.

ह्या वेबिनारच्या समारोपाचे भाषण प्रा.डॉ.सुनिता मगरे, संचलिका, मुंबई विद्यापीठ ह्यांनी उपस्थितांना केले.

हे वेबिनार यशश्वी होण्यासाठी पी.व्ही.डी.टी एज्युकेशन महाविद्यालयतील सर्व शिक्षकांचे योगदान लाभले आणि भविष्यात शिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचा मानस प्राचार्या. डॉ. मीना कुटे ह्यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट