थकीत पाणी बिलाची रक्कम भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली
- by Reporter
- Aug 15, 2020
- 564 views
मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी बिलाची रक्कम दिलेल्या मुदतीपूर्वी न भरल्यास थकीत पाणी बिलाच्या रक्कमेवर दरमहा अतिरिक्त २ % दराने अतिरिक्त आकार आकारण्यात येतो. या अभय योजनेची मुदत १२ ऑगस्टपर्यंत होती. मात्र मुंबईकरांच्या सोयीसाठी थकीत पाणी बिलाची रक्कम भरण्यासाठीचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन या अभय योजनेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

रिपोर्टर