अरेरे आज बाळासाहेब असायला हवे होते! हार्टच्या पेशंटला मदत करण्यास शिवसेना खासदारांचा नकार
- by Reporter
- Aug 14, 2020
- 438 views
मुंबई (प्रतिनिधी) : संकट काळात एखाद्या माणसाला मदत करणे हा मनुष्य धर्म आहे पण आज कोरोनाच्या या संकट काळात इतरांना मदत करायची सोडाच पण गंभीर आजारी रुग्णांना सुधा मदत करायला काही लोकप्रतिनिधी तयार नाहीत विरार मध्ये राहणारे सोनू जाधव हे हार्टचे पेशंट आहेत मात्र गंभीर आजारी रुग्णांनाही लोकल प्रवासाची सवलत नसल्याने त्यांना गेल्या चार महिन्यांपासून केईएम मध्ये उपचारासाठी जाता आले नाही त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती म्हणून त्यांनी मदतीसाठी शिवसेना खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना मदतीसाठी फोन करून आपल्या सारख्याच गंभीर आजारी रुग्णाची सध्या काय परिस्थिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मदतीचा हात देण्याचे सोडाच वरून सोनू जाधव यांनाच चार गोष्टी सूनवल्या आणि मदत करण्यास नकार दिला त्यामुळे बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना आता राहिलेली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया सोनू जाधव यांनी व्यक्त केली आहे
विरार ( पू ) च्या सुशीला प्राइड या इमारतीत राहणारे सोनू जाधव यांना दोन वेळा हार्ट अटेक येवुन गेला आणि त्यांची तीनदा इंजोग्रफी तर दोनदा एनजोपालस्ट झालीय त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना महिन्यातून किमान दोनदा तरी चेकपसाठी केईएम मध्ये जावे लागते पण गेल्या साडेचार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने तसेच लोकल ट्रेन बंद असल्याने त्यांना उपचार मिळू शकले नाहीत आणि विरार मधील खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्या इतपत त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यात लॉकडाऊन मुळे चार महिने पगार नाही त्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट झाली आहे आणि ही केवळ एकट्या सोनू जाधव यांचीच स्थिती नाही तर त्यांच्या सारखेच हार्टचे किडनीचे,कॅन्सरचे,ब्रेनचे असे कितीतरी रुग्ण आहेत ज्यांची मुंबईच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण लोकल ट्रेनच्या प्रवासाची त्यांना सवलत नसल्याने ते मुंबईला जावू शकत नाहीत त्यामुळे काही रुग्णांचा घरातच तडफडून मृत्यू झाला सोनू जाधव यांचेही तेच होण्याची शक्यता आहे म्हणूनच त्यांनी अरविंद सावंत यांना फोन आणि मॅसेज करून ही गंभीर समस्या त्यांच्या कानावर घातली पण सावंत यांनी काहीच ऐकूण घेतले नाही उलट तुम्ही विरार मध्ये राहता त्या हितेंद्र ठाकूरला सांगा असा उर्मट सल्ला दिला सोनू जाधव यांनी अरविंद सावंत यांच्याकडे पैशाची मदत मागितली नव्हती तर त्यांना आणि त्यांच्या सारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची सवलत मिळावी यासाठी आपण खासदार या नात्याने काहीतरी प्रयत्न करा अशी विनंती केली होती पण अरविंद सावंत यांनी काही एकूण घेतलेच नाही त्यामुळे संकट काळात सुधा आजारी माणसां बाबत हे लोक कसे वागतात हे दिसून आले त्याच बरोबर बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना लोकप्रतिनिधी आणि आताचे लोकप्रतिनिधी यांच्यात किती जमीन आसमानचे अंतर आहे ते दिसून आले

रिपोर्टर