नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मागणीनुसार प्रभाग 1 मध्ये पुन्हा सेरो चाचणी

मुंबई (प्रतिनिधी) : दहिसरमधील कोरोनाची साथ सद्या आटोक्यात येत असून त्यानुसार आज पुन्हा एकदा नागरिकांची सेरोलॉजिकल चाचणी करण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या वतीने (आयसीएमआर) दहिसर परिसरातील नागरिकांचे रक्त नमुने घेऊन यावेळी सर्वेक्षण (सेरो) करण्यात आले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार चेस द व्हायरस झिरो मिशन अंर्तगत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा कल समजण्यासाठी प्रभाग क्रमांक १ च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या प्रभागात पुन्हा एकदा सेरो चाचणी करण्याची मागणी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली होती.त्यानुसार ही चाचणी करण्यात आली. या सर्वेक्षणात करोनाच्या संक्रमणाची तीव्रता समजून त्याचा संसर्ग रोखता येईल अशी माहिती तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. या चाचणीमुळे दहिसर परिसरात या महिन्यात रुग्ण संख्या कमी झाली आहे.या चाचणीमध्ये माणसांची हार्ड इम्युनिटी (सामूहिक प्रतिकारक शक्ती) कळते. दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत पाटील नगरमध्ये ही सेरो चाचणी करण्यात आली .यापूर्वी त्यांच्या प्रभागातील आनंद गाईन,क्रिस्टल पॅलेस,कांदरपाडा, रॉक गार्डन व गणपत पाटील नगर १ ते ४ याठिकाणी या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.त्यावेळी ५० टक्के नागरिक पॉझिटिव्ह तर ५० टक्के निगेटिव्ह सापडले होते.

करोनाच्या संसर्गाच्या संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी पालिकेने ‘आयसीएमआर’च्या सूचनेनुसार ‘सेरो’ सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर , शाखाप्रमुख राजू इंदुलकर ,ज्यूडी मेंडोसा, जतीन परमार उपस्थित होते.या सर्वेक्षणातून सर्वसाधारणपणे लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगिलिक फैलाव समजून घेण्यास मदत होणार आहे.नागरिकांच्या घरी भेटी देऊन याबाबत माहिती आणि रक्त नमुने गोळा करण्यात आले आहेत.त्यानंतर कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळा, तसेच फरिदाबाद येथील

ट्रान्सलेशलन हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड  टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये हे नमुने पाठविण्यात येणार असून तेथे नमुन्यातील प्रतिपिंडांचे निदान करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट