आगामी गणेशोत्सवानिमित्त मुलुंड पोलिसांनी केले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पोलिस स्टेशनचे एसीपी पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि १३ ऑगस्ट रोजी मुलुंड येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे यांची मीटिंग मुलुंड पोलिस स्टेशनच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. या मीटिंग मध्ये आगामी गणेशोत्सव काळात सर्व गणेशोत्सव मंडळांनी व कार्यकर्त्यांनी पाळावयाचे नियम, आचारसंहिता, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना यांचे मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होवू नये, सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर तसेच सॅनिटायजरचा वापर करणे यासंबंधीच्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन व्हावे यादृष्टीने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावे यासाठी एसीपी  शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी पोलिस निरीक्षक ढसाळ, सहा. पो.नि. पाटील, खान, मुलुंड गणेश उत्सव समितीचे विलाससिंग राजपूत, सानू शेख तसेच मुलुंड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट