चेंबूर पालिका एम पश्चिम विभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण!
- by Reporter
- Aug 12, 2020
- 455 views
मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर एम पश्चिम विभागातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ भुपेंद्र पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोना विरोधात पालिका, पोलीस कामगार तसेच डॉकटर लढा देत असताना चेंबूर एम पश्चिम विभागातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र पाटील ही त्यात मागे राहिलेले नव्हते. गेल्या मार्च पासून चेंबूर, टिळक नगर, पी.एल लोखडे मार्ग, वाशीनाका अशा संपूर्ण एम पश्चिम विभागात कोरोना रुग्णांनी ३३२८ हजार पार केली आहे.तर २५९० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण २९७ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
एम पश्चिम विभागात दरदिवशी १५० ते २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत असल्याने या विभागातील कोरोना आटोक्यात आणण्याकरिता डॉ भुपेंद्र पाटील यांनी सतत विविध विभागात कोरोना चाचणी, तापमान तपासणी, अँटीजन चाचणी कॅम्प घेऊन एम पश्चिम विभागातील कोरोना रुग्ण संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आटोक्यात आणली आहे.
या करिता स्वतः सतत विभागात फिरत असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
या खऱ्या कोरोना योद्धा असलेल्या डॉ.भुपेंद्र पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

रिपोर्टर