लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विधानभवनात आदरांजली
- by Reporter
- Aug 01, 2020
- 887 views
मुंबई (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव महेंद्र काज, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

रिपोर्टर