साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या! चेंबूर येथील सुमन नगर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक अभिवादन करताना रामदास आठवले यांनी केली मागणी!
- by Reporter
- Aug 01, 2020
- 1000 views
मुंबई (जीवन तांबे) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे यंदाच वर्ष जन्मशताब्दी असल्याने त्यांना भारतरत्न देण्याची मागणी आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबई पूर्व उपनगर येथील सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे स्मारकास रामदास आठवले अभिवादन करीता आले होते.कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने आज अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. सोशल डिस्टंसिंग पाळत स्वयंसेवकांनी स्मारक परिसरात सँनीटायजर सहीत अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सेनेटायझरिंग करूनच स्मारक परिसरात प्रवेश दिला जात होता. दरम्यान काही संघटनांनी स्मारक परिसरात अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहीजे अशी घोषणा करत निदर्शने केली.
यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले , भाजपचे अशिष शेलार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, रिपाइंचे अविनाश महातेकर आदी मान्यवारांनी लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास भेट देवून अभिवादन केले.

रिपोर्टर