विक्रोळी येथे गरीब, गरजू विद्यार्थांना ॲानलाईन शिक्षणासाठी अन्ड्रोइड मोबाईल फोनचे मोफत वाटप

विक्रोळी  (शेखर भोसले) : शिवसेना शाखा क्र ११९ चे शिवसेना शाखाप्रमुख राजेश सोनावळे यांच्यातर्फे काही गरजू विद्यार्थ्यांना
"ॲानलाईन प्रशिक्षण" घेण्यासाठी आमदार सुनिल राऊत यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत अन्ड्रोइड मोबाईल फोनचे मोफत वाटप आमदार सुनील राऊत याच्या हस्ते विक्रोळी तील टागोर नगर क्र ५ येथे करण्यात आले.

आज देशात पसरलेल्या कोरोनासारख्या महामारी रोगामुळे लोकांवर आर्थिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आजचं युग हे तंत्रज्ञानाचे व विज्ञानाचे युग आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता काही गरजू, होतकरू, हुशार, शाळेकरी मुलांना "ॲानलाईन प्रशिक्षण" घेण्यासाठी खुपचं त्रास होत आहे हे निदर्शनास आल्यावर विक्रोळी टागोर नगर नं. ५ चे शाखाप्रमुख श्री.राजेश सोनावळे यांच्यावतीने हे सामाजिक कार्य करण्यात आले. यावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत, म.उपविभाग संघटिका रश्मी पहुडकर व इतर पुरुष आणि महिला शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट