"बी"विभागातील दाणाबंदर परिसरात आधुनिक सुसज्ज रुग्णालय उभारा
- by Reporter
- Jul 27, 2020
- 1297 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा कहर पहाता दिवसेंदिवस परिस्थितीचा सामना आरोग्यसेवेला करावा लागत आहे कोरोना उपचाराकरता रुग्णालये अपुरी पडत आहेत.शहरात अत्याधुनिक असे कोविड रुग्णालय बांधण्याकरता शासन यंत्रणा प्रयत्नशील असून त्याकरता जागा शोधली जात आहे
मुंबई महापालिकेच्या हद्दीत बरेच मुबलक मोकळे भूखंड पालिका व शासनाकडे आहेत,परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी खंत पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर व दैनिक आदर्श महाराष्ट्राचे संपादक रघुनाथ ढेकळे यांनी व्यक्त केली. मुंबई महापालिका "बी"विभागात येणाऱ्या कल्याण स्ट्रीट,ठाणा स्ट्रीट, सोलापूर स्ट्रीट, नंदलाल जानी रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात भूखंड मोकळे असून याठिकाणी लोकवस्तीही नामपात्र आहे या भूखंडाचा वापर नव्याने उभारावयाच्या कोविड रुग्णालयासाठी झाल्यास
ए/बी/सी/डी/ई व अन्य प्रभागातील जास्तीत जास्त रुग्णांना एक चांगली सुविधा मिळू शकेल असे मत दीपक शिरवडकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.

रिपोर्टर