जिया फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालकांना मोफत मास्क वाटप
- by Reporter
- Jul 27, 2020
- 780 views
मुलुंड (शेखर भोसले) : जिया फाउंडेशनतर्फे कोरोनाच्या बचावासाठी आंतराष्ट्रीय मानवाधिकार व अपराध नियंत्रण कक्ष यांना तसेच मुलुंड पूर्व मधील रिक्षा चालकांना स्टीमर व मास्क वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून रिक्षा बंद असल्यामुळे उत्पन्नाचे साधन बंद असलेल्या रिक्षा चालकांना कोणीच मदत केलेली नाही आहे परंतु आज जिया फाउंडेशनच्या वतीने रिक्षा चालकांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून मास्कचे वाटप केल्याने पहिल्यांदाच कोणीतरी रिक्षा चालकांकडे सहानुभूतीने पाहिले असल्याचे महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे चिटणीस सदानंद सावंत यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले व जिया फाउंडेशनच्या राजन गजरे यांचे आभार मानले. या मोफत मास्क वाटप कार्यक्रमाप्रसंगी जिया फाउंडेशनचे अध्यक्ष राजन गजरे यांच्यासोबत निलेश पवार, प्रविण सावंत, अमोल प्रधान, सिंड्रेला गवळी, निशा वायंगणकर, वैशाली राठोड, भालचंद्र वायंगणकर, पूजा वस्त आणि रिक्षा युनियनचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर