उल्हासनगरात पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पाहणी आढावा .
- by Rameshwar Gawai
- Jul 20, 2020
- 757 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : कोरोना साथीच्या संकटकाळात उल्हासनगर तसेच भिवंडी - निजामपूर महानगरपालिका परिक्षेत्रातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी त्यानी मुंबईतील धारावी पॅटर्न च्या धर्तीवर मिशन झिरो अंतर्गत टेस्टिंग वाढवणे, कोरोना संक्रमणाच्या संदर्भात जनजागृती करणे, होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांशी सतत संवाद साधून दर तीन दिवसांनी त्यांचा अहवाल सादर करणे, डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्यसेवकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, कोविड रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात याकरिता आयुक्त याना तसेच वरिष्ठ अधिकारी वर्गास निर्देश देण्यात आले आहेत .
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, महापौर आशाताई आशान, नगरसेवक अरुण आशाण उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज आशिया, डॉ.लकडावाला उपस्थित होते.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम