उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात सर्व सुविधा देण्यात याव्यात - महासचिव रोहित साळवे यांची मागणी .

उल्हासनगर / प्रतिनिधी  :    कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांच्या सोबत सर्व सामान्य इतर रुग्णांचे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे उपचारासाठी 

साधनसामग्री, मनुष्यबळ कमी पडत आहे, परिणामी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, काही जणांचा उपचाराअभावी नाहक जीव गमवावा लागला असल्याचा आरोप काँग्रेस महासचिव रोहित साळवे यांनी केला आहे . शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून रुग्णालयात सोयीसुविधा  पुरवाव्यात अशी मागणी केली आहे .

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय हे उलहानगर सहित आजू बाजू च्या शहरांमधील कोवीड व्यतिरिक्त इतर सर्वसामान्य रुग्णांसाठी उपचार करणारे प्रमुख शासकीय रुग्णालय आहे . परंतु मागील काही महिन्यांपासून येथे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना योग्य औषध उपचार होत नसल्याच्या तक्रारी वाढत  आहेत ,गेल्या काही दिवसात येथे मृत्युमुखी रुग्णांची संख्या लक्षणीय आहे, काल इंदुबाई बाविस्कर वय ५९ वर्ष या महिलेस वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असा तिच्या नातेवाईकांचा आरोप केला आहे. 

 या संदर्भात रोहित साळवे यांनी मध्यवर्ती रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ जाफर तडवी , खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन एक लेखी निवेदन दिले आहे . या वेळेस उल्हासनगर काँग्रेसचे नॉर्थ ब्लॉक अध्यक्ष सचिन गांधी व मयत इंदुताई बाविस्कर यांचा मुलगा राजू बाविस्कर हे देखील उपस्थित होते.

संबंधित पोस्ट