नगरसेविका रजनी केणी याच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

मुलुंड  (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड पूर्वेतील गव्हाणपाडात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने, गव्हाणपाडा कोळीवाडा व आजुबाजुच्या परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेविका रजनी केणी सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवित आहेत. आतापर्यंत नगरसेविका रजनी केणी यांनी आपल्या विभागातील स्थानिकांना, गोरगरिबांना, मजुरांना मास्क, सॅनिटायझर, होमिओपथी औषधांचे वाटप, सॅनिटायझर फवारणी, आरोग्य शिबिर, धान्य वाटप, अन्नाचे पॅकेट वाटप, इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या आहेत. 

बुधवार दि २४ जून रोजी विभाग क्र १०५ च्या नगरसेविका रजनी केणी यांच्यातर्फे गव्हाणपाडा कोळीवाडा येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरात ज्या नागरिकांना कोवीड विषाणूची लक्षणे आढळून आली त्यांची स्वाब टेस्ट करण्यात आली. सदर टेस्ट मध्ये दहा संशयित रूग्ण आढळून आले. त्यांना त्वरित कोरंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर औषधोपचार चालू करण्यात आले आहेत. परिसरातील २५० नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.


संबंधित पोस्ट