'पारंबी प्रोडक्शन निर्मित" फोटोजेनिक फेस २०२० एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन
- by Reporter
- Jun 24, 2020
- 833 views
मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : पारंबी प्रॉडक्शन तर्फे हा उपक्रम फोटोजेनिक फेस २०२० या थीमवर आधारित आहे. या स्पर्धेचे आयोजन अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अक्षय वास्कर यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी झाल्यावर प्रोडक्शनतर्फे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातील.जास्तीत जास्त लाईक्स मिळतील अशा स्पर्धेक विजेतेपदासाठी ग्राह्य होईल अशी अट आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त २५/- रूपये शुल्क आहे.या स्पर्धेतील तीन विजेते काढण्यात येतील. विजेत्यांना रोख रक्कम आणि पारितोषिक देण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची शेवटची तारीख ३० जून आहे तर स्पर्धेचा निकाल १० जुलै रोजी लागेल अशी माहिती गणेश तळेकर यांनी दिली आहे.अधिक माहितीसाठी - ८८९८०७१००६/९३७२२३७३६४.
यावर संपर्क करू शकता. आपल्याला प्रत्येकाला आपण सुंदर आहोत असेच वाटत असते.पण या सुंदरेला योग्य व्यासपीठाची गरज असते.आम्ही ते व्यासपीठ सोशल मीडिया आणि पारंबी प्रोडक्शन यातर्फे तुम्हाला देत आहोत.आपण या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन पारंबी प्रोडक्शनचे प्रमुख अक्षय वास्कर यांनी केले आहे.

रिपोर्टर