सेवाभावी रमेश कांबळे यांची गरजू कलावंताना सढळ हस्ते मदत
चेंबूरसह मुंबईतील अनेक विभागात आर्सेनिक अलब्म ३० या रोगप्रतिकारक गोळ्यांचे मोफत वाटप निर्जंतुकिकरणासाठी अनेक वस्त्यात मोफत जंतुनाशक फवारणी
- by Reporter
- Jun 23, 2020
- 448 views
मुंबई (प्रवीण रा.रसाळ) : राजकारणासह समाजकार्याचे बाळकडू प्राप्त झालेले चेंबूरचे माजी नगरसेवक रमेश कांबळे यांच नाव त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहे, सध्या ही त्यांच्याद्वारे केले गेलेल्या स्तुत्य उपक्रमा मुळे सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. मा. रमेश कांबळे यांनी सामाजिक भान लक्षात ठेवुन कोरोना व्हायरस कोव्हिड १९ या दुर्धर महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या हाडाच्या कलाकारांसाठी सढळ हस्ते मदत करत त्याना दिड महिना पुरेल इतक्या प्रमाणात उत्कृष्ट राशनचे स्वतः वाटप केले ज्यात ५ किलो तांदूळ,५ किलो गव्हाचे पीठ,२ किलो साखर,३ किलो डाळ,१ लिटर तेल, मसाला व हळद पॅकेट इतक्या शिधेचा समावेश होता, रमेश कांबळे यांनी आजवर महाराष्ट्रातील मुबंई, ठाणे, कल्याण, नाशिक, सोलापूर, नगर, पुणे, औरंगाबाद अश्या काना कोपऱ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत स्वतः राशन किटचे वाटप घरपोच केले त्यानी सुरू केलेल्या या मदतकार्यात आजवर त्यानी २५०० गोरगरीब गायक, वादक, कलाकार, नकलाकार, जादूगार, नाटककार,सिने वर्कर्स यांना घरपोच राशन किट वाटप केले आहे त्यांच्या या कार्याचा लाभ घेणाऱ्या कलावंतानी त्यांचे आभार कोणत्या शब्दात मांडू हेच कळत नसल्याचे उद्गार व्यक्त केले असले तरी त्यांच्या डोळ्यातील भाव न बोलता बरच काही सांगून गेल्याचेआमच्या प्रतिनिधीनी सांगितले आहे. सध्या ही रमेश कांबळे जस जमेल तशी मदत गरजूंना करत आहेत त्यासोबतच चेंबूर व आजूबाजूच्या
विभागात आर्सेनिक अलब्म ३० चे मोफत वाटप, मोफत मास्क वितरण तसेच झोपडपट्टी, वस्त्या, मार्केट अशी रहदारीच्या ठिकाणांचे निर्जंतुकी करण करण्यासाठी संपूर्ण मुंबईत कोठही मोफत जंतुनाशक फवारणी अश्या प्रकारची सामाजिक कामे ही ते करत आहेत. त्याना सदर कामांसाठी प्रेरणा केवळ त्यांच्या मनात समाजाप्रति असलेल्या सदभावनेमुळे मिळते असे त्यानी आमच्या प्रतिनिधीं सोबत बोलताना सांगितले

रिपोर्टर