बदलापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्ण .
- by Rameshwar Gawai
- Jun 14, 2020
- 593 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात शनिवारी (ता.१३) कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये
मुंबई फोर्ट येथील एचडीएफसी बँकेचा ४५ वर्षीय कर्मचारी, हिंदुजा हॉस्पिटलचा ३६ वर्षीय कर्मचारी, माटुंगा रेल्वे वर्कशॉपचा २७ वर्षीय कर्मचारी, घाटकोपर येथील खाजगी कंपनीची ५५ वर्षीय महिला कर्मचारी, चेंबूर येथील खाजगी कंपनीचा ३७ वर्षीय कर्मचारी व एका खाजगी कंपनीच्या २१ वर्षीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ८ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये एका ८ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ४०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. १९० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम