युवासेनेकडून आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप .

उल्हासनगर / प्रतिनिधी  : उल्हासनगर युवासेना सरचिटणीस अँड.केतन नलावडे व लासा सुपर्जनिक या कंपनी च्या सहकार्याने १५००  कुटूंबाला आर्सेनिक अल्बम  ३०  या गोळ्यांचे   वाटप करण्यात आले.

आर्सेनिक अल्बम  ३०  व  होमिओपॅथी औषधाने कोरोनापासून  बचाव करता येतो  हे सिद्ध झाले आहे.  केंद्र  सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीचे औषध आर्सेनिक अल्बम ३०  या  औषधाची शिफारस केलेली आहे हे औषध  कोरोनाविरुद्ध  रोग प्रतिकार शक्ती इतकी वाढवते की कोरोनापासून बचाव  होतो. 

केरळ तसेच इतर ८  राज्यांनी  हेच औषध लाखो लोकांना वाटल्याने ह्या रोगाचा प्रसार थांबला  व त्यामुळे कोरोनावर उत्तम रित्या नियंत्रण आणले आहे  ३  गोळ्या रोज एकदा असे ३  दिवस घ्यावे असे सांगितले आहे.

 त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,  सचिव वरुण सरदेसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व युवासेनेचे  कल्याण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना  शहर प्रमुख व  विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी,नगरसेवक धनंजय बोडारे यांच्या सुचनेनुसार उल्हासनगर शहरात कोविड १९  चे संक्रमण २००  च्या पुढे गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे . महापालिका  व पोलीस प्रशासना  कडून विविध माध्यमातून सोशलडिस्टनचे धडे गिरविण्यात येत आहेत.  पण तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व संक्रमण रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.  तोच दुवा  धरत लासा सुपर्जनिक कंपनी व युवासेना उल्हासनगर शहर सरचिटणीस अँड.केतन नलावडे यांनी जनहितार्थ शहरातील युवासेना पदाधिकारी, वकिल, पोलीस,पत्रकार,इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व शहरातील  १५००  कुटूंबाला आर्सेनिक अल्बम  ३०  या गोळ्यांचे वाटप  युवासेने च्या माध्यमातून  करण्यात आले असून गरज पडल्यास पुन्हा वाटप करण्यात येणार असल्याचे अँड. केतन नलावडे यांनी सांगून "फोटो नको आशिर्वाद हवा" असा  छान संदेश सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट