उल्हासनगरात करोनाग्रस्त रुग्णांची डबल सेचुरी नव्या १७ रुग्णांमुळे , संख्या झाली २०८ आँरेज झोनचे स्वप्न धुळीस .

उल्हासनगर / प्रतिनिधी : रविवारी  एकदम २५ करोना संक्रमीत रुग्ण आढळून आल्यानं करोनाग्रस्तांची वाटचाल द्वि शतकाकडे जात असल्याची शंका व्यक्त केली जात होती.आज पुन्हा १७ नवे रुग्ण मिळून आल्यानं हि शंका वास्तव्यास उतरली असून करोनाग्रस्तांनी नाबाद डबल सेंचुरी पार करत ,२०८ चा आकडा नोंदवला आहे. यामुळे शहरातील नागरीकां मध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

उल्हासनगरात करोना बाधित रुग्णांन मध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.काल सम्राट अशोकनगर आणि अन्य विभागातून २५ रुग्ण मिळून आले होते. आज पुन्हा सम्राट अशोकनगर मधून ५, ब्राम्हणपाडा ५ , भारत चौक २ , सेक्शन २२ मधून १ , संभाजीचौक १ , आणि हिराघाट परीसर मधिल एका मृत व्यक्तीचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला . त्यामुळे एकुण संख्या २०८ झाली आहे. यापैकी ६१ रुग्ण करोना मुक्त झाले असून मृतांची संख्या ७ झाली आहे. तसेच  कोविंड रुग्णालय उल्हासनगर  आणि ठाणे , मुंबई ,कल्याण आणि भिंवडी येथे१४० रुग्ण उपचार घेत आहेत.

कोविंड -१९ या आजारानं शहराची परस्थिती बिकट केली आहे.पालिका प्रशासनाचे नियंत्रण सुटल्यान शहराची अवस्था दयनीय झाली असल्याचा आरोप शहरातील जाणकार करत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक काहीच हालचाल करतांना दिसत नाही. तत्कालीन आयुक्त व उपायुक्तांची बदली करुन शासनाला काय फायदा झाला? नवे आयुक्त अद्याप अँक्टीव्ह झाले नाहीत. ते कधी कार्यशिल होतील? शहर खड्डयात गेल्यावर.अशी संतप्त प्रतिक्रिया नागरीकां कडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित पोस्ट