घरकाम करणाऱ्या महिलांना धान्य वाटप
- by Rameshwar Gawai
- May 14, 2020
- 495 views
बदलापूर : बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांनी घरकाम करणाऱ्या ३५ महिलांना तांदूळ व तूरडाळ देऊन त्यांना मदतीचा हात दिला लॉकडाऊनमुळे बहुतांश घरकाम करणाऱ्या महिलांचा रोजगार बंद झाला आहे. काहींच्या घरात तर घरकाम करणाऱ्या महिलांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे,अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या महिलांना यथाशक्ती धान्य वाटप केल्याचे देशमुख यांनी सांगितले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम