पोलिसांना रोटरीतर्फे सुरक्षा किटचे वाटप
- by Rameshwar Gawai
- May 14, 2020
- 376 views
अंबरना :कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. या संसर्गाचा मुकाबला करताना त्यांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, याकरिता रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी तर्फे अंबरनाथ पोलिसांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांना १५० जणांना हे सुरक्षा किट देण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हे किट स्वीकारले. त्यामध्ये हँड सॅनिटायजर, हँड ग्लोव्हज, थ्री लेयर फेसमास्क आदींचा समावेश आहे. हे सुरक्षा किट वाटप करताना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अभिजित राजपूत यांचा वाढदिवस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे उपस्थित सर्व पोलिसांना चॉकलेटचे वाटप करून राजपूत यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम